जिल्हा परिषद, धाराशिवच्या सामान्य माणसाच्या हक्कासाठी उभं राहणारं नाव म्हणजेच धनंजयदादा सावंत
धाराशिव प्रतिनिधी :
सामान्य माणसाचे प्रश्न, अडचणी आणि हक्क यासाठी ठामपणे उभं राहणाऱ्या नेतृत्वामध्ये धनंजयदादा सावंत यांचं नाव आज जिल्ह्यात ठळकपणे पुढे येत आहे. जवळा सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या धनंजयदादा सावंत यांनी सातत्याने नागरिकांचे प्रश्न प्रशासन दरबारी मांडत लोकांचा विश्वास संपादन केला आहे.
जिल्हा परिषद, धाराशिव येथे विविध ग्रामस्थांच्या समस्या, विकासकामांशी संबंधित तक्रारी तसेच मूलभूत सुविधांबाबतचे प्रश्न मांडून त्यांनी प्रभावी पाठपुरावा केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकासाशी संबंधित विषयांवर त्यांची सक्रिय भूमिका दिसून येते.
“आपला माणूस” अशी ओळख निर्माण करत धनंजयदादा सावंत हे सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. नागरिकांच्या अडचणी ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न ही त्यांची कार्यपद्धती असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.
जिल्हा परिषद स्तरावर विकासकामांना गती देत लोकाभिमुख भूमिका घेणाऱ्या धनंजयदादा सावंत यांच्या कार्याकडे आता जिल्ह्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.





















Total views : 4449