• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 30, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

अशोक खरात प्रकरणात सहभागी ३९ राजकारण्यांची नावे उघड करा! मुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्दांचा खेळ करून बचाव करू नये; संविधानाचे भान राखावे”;

Sayyad Musa by Sayyad Musa
April 6, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

“अशोक खरात प्रकरणात सहभागी ३९ राजकारण्यांची नावे उघड करा! मुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्दांचा खेळ करून बचाव करू नये; संविधानाचे भान राखावे”; धाराशिवमध्ये ॲड.असीम सरोदे यांची कडाडली तोफ ‘अंनिस’च्या व्यासपीठावरून राजकारण आणि

धाराशिव | प्रतिनिधी
“राजकारणातील लोक अनेकदा समाजमान्यतेसाठी आणि मतपेढी जपण्यासाठी होम-हवन, पूजा-अर्चा यांसारख्या अंधश्रद्धांचा आधार घेतात. मात्र, आता केवळ चर्चा करून चालणार नाही, तर जिथे जिथे अंधश्रद्धा पसरवणारे वर्तन दिसेल, तिथे सर्वसामान्य जनतेने तक्रारी दाखल करून गुन्हे नोंदवले पाहिजेत,” असे परखड प्रतिपादन सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि संविधान विश्लेषक ॲड. असीम सरोदे यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे ‘कायदा व राजकारणातील भोंदूगिरी’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री आणि राजकीय नेत्यांवर प्रहार
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना ॲड. सरोदे म्हणाले की, या प्रकरणात सुमारे ३९ राजकीय नेते गुंतलेले असण्याची शक्यता आहे. या सर्व राजकारण्यांची नावे तातडीने जाहीर झाली पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ शब्दभ्रम करून स्वतःचा बचाव करू नये; उलट संविधानाने दिलेल्या जबाबदारीनुसार वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

कायद्याची अंमलबजावणी आणि पोलीस यंत्रणा
महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा केवळ कागदावर राहून उपयोग नाही. प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करण्याचे आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठोस नियम आणि पोलिसांना योग्य मार्गदर्शक सूचना मिळणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. न्यायालयात होणाऱ्या पूजा-अर्चांवरही त्यांनी यावेळी कडक शब्दांत ताशेरे ओढले.

दिग्गजांची उपस्थिती आणि सत्कार
कार्यक्रमाच्या प्रारंभी अंनिस जिल्हा कार्यवाह ॲड. रवींद्र मैंदाड आणि ॲड. देविदास वडगावकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. अस्मिता बालगांवकर यांनी प्रास्ताविकातून पाहुण्यांची ओळख करून दिली. ज्येष्ठ अभ्यासक ॲड. राज कुलकर्णी यांनी सद्यस्थितीतील राजकीय अंधश्रद्धेवर भाष्य केले.

धाराशिवकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या कार्यक्रमाला धाराशिवचे आमदार कैलास (दादा) पाटील, नानासाहेब पाटील, एम.डी. देशमुख सर, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र केसकर, संतोष करवर, लोमटे सर, सामाजिक कार्यकर्ते रवी डोईफोडे यांसह धाराशिव शहरातील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, अंनिसच्या या चळवळीत सहभागी होण्यासाठी अनेक तरुणांनी घटनास्थळीच आपली नोंदणी केली.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन धाराशिव जिल्हा अंनिस शाखेचे जिल्हा कार्यवाह ॲड. रवींद्र मैंदाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन धाराशिव जिल्ह्याचे अंनिसचे
प्रधान सचिव चंद्रकांत उळेकर यांनी केले. राष्ट्रगीताने या प्रबोधनात्मक सोहळ्याची सांगता झाली.

Previous Post

केसरजवळगा येथे श्री हनुमान यात्रा, रथोत्सवाला हजारो भाविकांची मांदियाळी..

Next Post

नमस्ते धाराशिवचे संपादक संदीप कोकाटे यांना धमकी; कळंबमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

नमस्ते धाराशिवचे संपादक संदीप कोकाटे यांना धमकी; कळंबमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा

बळीराजासाठी सावंत यांची पुढाकार; स्वखर्चातून ८० लाखांचा निधी, १६० शेतरस्त्यांना मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार व संघटन बांधणीवर सकारात्मक चर्चा

May 30, 2026

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

May 29, 2026

युवाशक्तीचा आवाज ठरणार जनतेचा नवा विश्वास

May 29, 2026

पार्डी-भिगवण चार लेन महामार्गाला तातडीने मंजुरी द्यावी

May 28, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
007999
Total views : 12818

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In