केसरजवळगा येथे श्री हनुमान यात्रा, रथोत्सवाला हजारो भाविकांची मांदियाळी..
मुरूम/ प्रतिनिधी
मुरूम परिसरातील केसरजवळगा येथे दि.०४ वार शनिवार रोजी श्री हनुमान यात्रा महोत्सव मोठ्या थाटात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त प्रतिवर्षी रथमहोत्सव सोहळा मोठ्या थाटाने साजरा केला जातो. दि.०४ रोजी पहाटे ०५ वाजता श्री हनुमान मंदिरात महाआरती नंतर रथमहोत्सव यात्रा मोठ्या थाटात,फटकड्याच्या अतिषबाजीने वाजत गाजत हजारो भाविकांचे साक्षीदाराने भक्तिमय वातावरणात शांततेत पार पडला. यात्रेसाठी श्री हनुमान जन्मोत्सव दिवसापासून मंदिर समितीच्या वतीने जोरात तयारी चालू असते, केसरजवळगा येथील बाहेरगावी असणारे तरुण वर्ग, नागरिक, सासरी असणारे मुली आजच्या रोजी यात्रेनिमित्त उपस्थित राहून यात्रा मोठ्या उत्साहात पार पाडतात. याप्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील व कर्नाटक, आंध्र, तेलंगना राज्यातील भक्तगण यात्रेनिमित्त उपस्थित राहून रथमहोत्सव सोहळा अगदी भक्तिमय वातावरणात पार पाडतात. शेकडो वर्षापासून ही यात्रा संपन्न होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.सामाजिक सलोखा जोपासत सर्व धर्मीय नागरिक या यात्रा महोत्सवात सहभाग नोंदवून अगदी भक्तिमय वातावरणात आपल्या गावाची यात्रा उत्सव थाटात साजरी करतात. यात्रा महोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी मंदिर समिती,गावातील नागरिक,तरुण वर्ग मोठ्या हिराररीने सहभाग नोंदवत असतात.याप्रसंगी मुरूम पोलीस प्रशासनाच्या वतीने सहायक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांचा सहकार्य लाभला. यात्रेसाठी हजारो भक्तांची मांदियाळी केसरजवळगा गावात लोटली होती. देवी देवतांच्या माध्यमातून जनकल्याणसाठी रथोत्सवाला प्रारंभ झाला आणि आजतगायत संपूर्ण देशभरात उत्सवाची परंपरा कायम जोपासली जाते, विविधता मध्ये एकता असलेल्या देशातील संस्कृती अबाधित राहण्यासाठी हे रथोत्सवाची परंपरा असल्याचे मत केसरजवळगा येथील श्री जडीबसवलिंगेश्वर मठाचे मठादीपती श्री विरंतेश्वर महास्वामी यांनी सांगितले.




















Total views : 8851