• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

कळंबमध्ये गुटखा माफियांना पोलिसांचा जबरदस्त दणका; ५ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा साठा जप्त

Sayyad Musa by Sayyad Musa
June 22, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
116
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

कळंबमध्ये गुटखा माफियांना पोलिसांचा जबरदस्त दणका; ५ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा साठा जप्त
पांडे गल्लीतील गोदामावर धाडसी छापा; पोलिसांच्या कारवाईवर जनतेतून कौतुकाचा वर्षाव
कळंब : शहरात अवैध गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात कळंब पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत गुटखा माफियांना चांगलाच दणका दिला आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ५ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
दिनांक २२ जून २०२६ रोजी पोलिस ठाणे कळंबचे पोलिस निरीक्षक शकील शेख यांच्या नेतृत्वाखाली आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कळंब शहरातील पांडे गल्ली येथे सोमनाथ क्षीरसागर यांच्या मालकीच्या गोदामावर दुपारी सुमारे २ वाजण्याच्या दरम्यान अचानक छापा टाकण्यात आला.
या छाप्यामध्ये विविध प्रकारचा गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून एकूण ५ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे शहरातील अवैध गुटखा विक्रेते व साठेबाजांमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या या धाडसी मोहिमेचे नागरिकांकडून जोरदार स्वागत होत आहे.
आरोग्यास घातक असलेल्या आणि कायद्याने प्रतिबंधित करण्यात आलेल्या तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांनी घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे. अशाच प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईबद्दल सर्वसामान्य नागरिकांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, अवैध व्यवसायाविरोधातील ही मोहीम अधिक तीव्र करण्याची मागणी होत आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख, सहायक पोलिस निरीक्षक राम घाडगे, पोलिस नाईक भाऊसाहेब पोळ, अर्जुन शेख, इरफान शेख, पोलिस अंमलदार परमेश्वर कदम, अनिल भोसले, अय्याराम खाडे, गोविंद मोटेगावकर तसेच महिला पोलिस अंमलदार क्षीरसागर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Previous Post

१५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात सर्व गटांना समान न्याय द्या; शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

देवदरीच्या हजरत शेख फरीद बाबा दर्ग्यात उमेशराजे निंबाळकर यांची जियारत; दर्गा समितीकडून उत्स्फूर्त सत्कार

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

देवदरीच्या हजरत शेख फरीद बाबा दर्ग्यात उमेशराजे निंबाळकर यांची जियारत; दर्गा समितीकडून उत्स्फूर्त सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

देवदरीच्या हजरत शेख फरीद बाबा दर्ग्यात उमेशराजे निंबाळकर यांची जियारत; दर्गा समितीकडून उत्स्फूर्त सत्कार

June 23, 2026

कळंबमध्ये गुटखा माफियांना पोलिसांचा जबरदस्त दणका; ५ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा साठा जप्त

June 22, 2026

१५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात सर्व गटांना समान न्याय द्या; शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

June 22, 2026

बार्शीत सदिच्छा भेट; युवा नेतृत्व मल्हार पाटील यांनी केला राजेंद्र राऊतांचा सत्कार

June 22, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
009596
Total views : 15036

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In