बार्शीत सदिच्छा भेट; युवा नेतृत्व मल्हार पाटील यांनी केला राजेंद्र राऊतांचा सत्कार
बार्शी : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्रभाऊ राऊत यांनी मिळविलेल्या दणदणीत विजयाबद्दल धाराशिव जिल्ह्यातील भाजपाचे युवा नेतृत्व मल्हार पाटील यांनी बार्शी येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी विजयाबद्दल अभिनंदन करत पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महायुतीच्या विजयाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी रणवीर राऊत यांचेही अभिनंदन करण्यात आले.
राजेंद्रभाऊ राऊत यांचा विजय हा केवळ एका उमेदवाराचा विजय नसून जनतेने विकासाभिमुख नेतृत्वावर दाखविलेला विश्वास असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेले अथक परिश्रम, जनतेशी असलेली नाळ आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवून केलेले काम यामुळेच हा विजय शक्य झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
धाराशिवचे युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले मल्हार पाटील यांनी राजेंद्रभाऊ राऊत यांची भेट घेत महायुतीच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. राज्याच्या आणि प्रदेशाच्या विकासासाठी महायुतीचे नेतृत्व अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील या विजयामुळे महायुतीचे संघटनात्मक बळ अधिक मजबूत झाल्याचे मानले जात असून आगामी राजकीय घडामोडींमध्ये या विजयाचे दूरगामी परिणाम दिसून येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 15036