मोहोळ च्या विकासासाठी निधी ची कमतरता भासू देणार नाही
— ना.देवेंद्र फडणवीस
➡️ सोमेश क्षीरसागर यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
दैनिक त्रिशक्ती / राजेश शिंदे
मोहोळ : मोहोळ नगरपरिषद निवडणूक ही माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा ज्येष्ठ नेते नागनाथभाऊ क्षीरसागर मार्गदर्शनाखाली तसेच सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी असे आम्ही सगळे लढलो आहोत.त्यांच्या मार्गदर्शनाने नक्कीच या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळेल असा आशावाद मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त करीत माजी आमदार यशवंत माने यांच्या कार्यकाळात जेवढा विकासनिधी मोहोळ शहराला व तालुक्याला दिला होता.त्याही पेक्षा अधिकचा निधी आपण आम्हाला द्यावा अशी आग्रही मागणी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून त्यांनी मोहोळ च्या विकासासाठी निधीची कसलीही कमतरता भासू देणार नाही.असा शब्द दिला असल्याची माहिती भाजपा चे युवनेते सोमेश क्षीरसागर यांनी माध्यमांना दिली.
भाजपा चे युवनेते सोमेश क्षीरसागर यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनास उपस्थित राहून मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनेक विषयांवर व मोहोळ नगरपरिषद निवडणूकी बाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली.त्यांनी पुढे सांगितले की,पाटील-क्षीरसागर हा मागील ३० वर्षांचा राजकीय संघर्ष संपल्याने मोहोळ शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण झाले आहे.त्यामुळे येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी विजयी होईल.जरी आमदार आपल्या विचारांचा नसला तरी भविष्यात होणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये आपली सरशी होईल त्यामुळे मोहोळ शहरासह मतदार संघात विकास निधी मोठ्या प्रमाणात द्यावा.अशी आग्रही मागणी केली आहे.तर त्या मागणीला मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवित मोहोळ साठी विकास निधीची कमतरता भासू देणार नाही.असे आश्वस्त केले असल्याचे ही युवनेते सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले






















Total views : 4449