तेरणा अभियांत्रिकीच्या दोन प्राध्यापकांच्या प्रशिक्षक कार्याचा जगप्रसिद्ध नेटवर्किंग आणि आयटी कंपनी “सिस्को” यांच्याकडून ईन्स्ट्रक्टर एक्सलंस या पूरस्काराने सन्मान
धाराशिव : धाराशिव येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये वर्ष २०१८-१९ पासून सिस्को या जगप्रसिद्ध कंपनीचे सिस्को नेटवर्किंग ट्रेनिंग सेंटर सुरु झाले . या ०८ वर्षात हजारो विद्यार्थ्यांनी प्रोग्रामिंग , नेटवर्किंग , सायबर सेक्युरिटी अशा विविध क्षेत्रातील कोर्से पूर्ण केले .तेरणा अभियांत्रिकीचे प्रा. अनिरुद्ध देशपांडे हे कोर्से कोओर्डीनेटर तसेच कोर्से इंस्ट्रक्टर म्हणून काम पाहतात , प्रा.कृष्णकांत मुळे हे कोर्से इंस्ट्रक्टर म्हणून कार्यरत आहेत . दोघांच्याही मार्गदर्शनखाली हजारो विद्यार्थ्यांनी सिस्को राऊंटिंग अँड स्विचिंग अशा सीसीएनए कोर्से शृखंलातील प्रमुख कोर्से तसेच इतर कोर्सेस पूर्ण केले.
प्रा. अनिरुद्ध देशपांडे आणी कृष्णकांत मुळे यांना वर्ष २०२५ साठी एक्स्पर्ट लेवल इंस्ट्रक्टर एक्सलंस अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले . जगातील पहील्या १०% प्रशिक्षकांची निवड या पूरस्कारासाठी करण्यात येते . विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखत यशस्वी रित्या पूर्ण करण्यासाठी या कोर्सेस चा उपयोग झाला आहे . इंटर्नशिप , कॅम्पस प्लेसमेंट , ट्रैनिंग अशा विविध विभागात अशा कोर्सस चा उपयोग होत आहे .आयटी कंपनीत नोकरीस लागल्यावर देखील क्लाऊड कॉम्पुटिंग , ऍमेझॉन वेब सर्विस , सायबर सेक्युरिटी अशा क्षेत्रात काम करताना विद्यार्थ्यांचा नेटवर्किंग आणि प्रोग्रामिंग फंडामेंटल्स चा पाया पक्का झाल्यामुळे बढती साठी व प्रोजेक्ट मिळवण्यास मदत होत आहे . संस्थेचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी सेंटर च्या कोर्सेस चा लाभ विभागातील अधिकतम विद्यार्थ्यांना घेण्यात येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्राध्यापकांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ .पदमसिंहजी पाटील साहेब , महाराष्ट्र शासनाच्या मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील , कार्यकारी विश्वस्त मल्हार पाटील , सर्व विश्वस्त ,व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे , प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने , सर्व विभागप्रमुख तसेच प्राध्यापकांनी अभिनंदन केले .




















Total views : 7806