शेतीच्या वाटेवरून येवती गावात वाद पेटला; मधुकर गोडसे व राहुल गोडसे यांच्यावर मारहाण, दमदाटी व जातिवाचक शिवीगाळीचा गुन्हा दाखल!
➡️ येवती (ता. मोहोळ) येथे गंभीर प्रकार; विश्वजीत नागनाथ राजगुरू यांची पोलिसांकडे फिर्याद.
➡️ अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल .
➡️ मोहोळ पोलीस ठाण्याची आनास्था वेळीच दखल घेतली असती तर आजची घटना घटलीच नसती .!!
सोलापूर / प्रतिनिधी
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील येवती येथे शेतीच्या वाटेच्या वादातून गंभीर स्वरूपाचा वाद उफाळून आला असून, मधुकर विठ्ठल गोडसे, राहुल मधुकर गोडसे यांच्यावर मारहाण, दमदाटी व जातिवाचक शिवीगाळ केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी नागनाथ राजाराम राजगुरू (वय २६) यांनी मोहोळच्या पोलिस ठाण्याला लेखी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसाकडून अधिकची माहिती मिळालेली अशी की फिर्यादी नागनाथ राजगुरू यांच्या मते, त्यांच्या कुटुंबाची शेती गट क्रमांक ४९३/३ मध्ये असून त्या शेतात जाण्यासाठी पारंपरिक वाट वापरली जाते. मात्र आरोपींकडून ही वाट अडवून वारंवार वाद निर्माण केला जात होता. यापूर्वीही शिवीगाळ व धमकावण्याचे प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दि. ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजता नागनाथ राजगुरू व त्यांचे चुलत भाऊ सागर राजगुरू शेताकडे जात असताना आरोपी मधुकर गोडसे व राहुल गोडसे यांनी वाट अडवून त्यांना अडवले. यावेळी दोघांनी शिवीगाळ करत “तुम्हाला जिवंत सोडणार नाही” अशा प्रकारची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच त्यानंतर हाताने मारहाण करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेदरम्यान जातिवाचक अपमानास्पद शब्दांचा वापर करून फिर्यादींचा अपमान करण्यात आल्याने सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सततच्या त्रासामुळे फिर्यादी कुटुंब भयभीत झाले असून त्यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणी केली आहे.
कडक कारवाईची मागणी :
या प्रकरणात मधुकर गोडसे, राहुल गोडसे यांच्यावर भारतीय दंड संहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, मी या अगोदरही मोहोळ पोलीस ठाण्यात यासंदर्भात वेळोवेळी माहिती दिली होती जर वेळीच पोलीस प्रशासनाने माझ्या तक्रारीची दखल घेतली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती या घटनेला मोहोळचे पोलीस प्रशासन जबाबदार आहे तरी या प्रकरणी कडक कारवाई करावी अशी मागणी विश्वजीत नागनाथ राजगुरू याने केली आहे.
प्रशासनाची भूमिका काय?
ग्रामीण भागात वाढत चाललेल्या अशा प्रकारांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे येवती गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.





















Total views : 9127