बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणात प्रशासनाचे दुर्लक्ष… जयनंद उबाळे
पुसद उपजिल्हा रुग्णालय परिसरात मोठया प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आम्ही बंचित बहुजन आघाडी यांनी अनेक वेळा तक्रारी करून तसेच माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.हा विषय सार्जजनिक हिताचा असुन सुध्दा प्रशासनाकडुन अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचा आमचा आरोप आहे. या संदर्भात वृत्तपत्रात देखील बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत.प्रशासनाच्या या निष्क्रियतेच्या निषेधार्थ दिनांक ६/४/२०२६ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, पुसद या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्यात यावी.
संबंधित दोषीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा गुना दाखल करण्यात यावा,
चुकीची व अपूर्ण माहिती देणाऱ्या अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. माझ्या सर्व तक्रारीवी स्वतंत्र चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा.जळतन व लाकुड विकाणारे भांडारपाल व वैद्यकीय अधिक्षकावर कारवाई करण्यात यावी.वनविभागाने केलेला पंचनामा कागदपत्री असुन सदर झाडाची खोडे कोणत्या जातीची होती ती तपासणी करणे गरजेचे असतांना सुष्टा ते न करता नावापुरता पंचनामा केलेला असल्यामुळे वनविभागावर सुध्दा कारवाई करण्यात यावी.नगर परिषद पुसद दुतकर अधिकारी यांनी दंडात्मक कार्यवाही न करता प्रकरण दडपण्याचे काम केल्यामुळे त्यांचेवर सुध्दा कार्यवाही करण्यात यावी.जिल्हा शल्यचिकीत्क यवतमाळ व वैद्यकीय अधिक्षक पुसद यांनी त्यांच्या मालकीचे जागेतील झाडे तोडल्यापर चौकशी समिती लाकूड जळतन विकल्या संदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. प चौकशी समिती दरम्यान ईतर विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, वनविभाग यांचे कोणतेही प्रतिनिधींना बोलविले नाही. त्यामुळे सदर प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे
व्यांचेवर सुध्दा कारवाई करण्यात यावी.उपजिल्हा रुग्णालय, पुसद A.R.T. Center टिन शेडचे कामाचे बांधकाम किंमत रु.८.३३.२३९/- झाली का? याची चौकशी करण्यात यावी.
जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
कैलास श्रावणे
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ



















Total views : 9127