💧मराठवाडा शुद्ध जल एटीएम उपक्रमाला नवसंजीवनी 💧
तब्बल चार वर्षांपासून बंद पडलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाला आज नवसंजीवनी मिळाली आहे! 💙
नगरपरिषद कळंबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “मराठवाडा शुद्ध जल एटीएम मॉडेल” अंतर्गत आता नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी थेट त्यांच्या घरापर्यंत गाडीद्वारे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे. 🚛💦
हा उपक्रम केवळ पाणीपुरवठाच नाही, तर नागरिकांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची जबाबदारी उचलणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
“स्वच्छ पाणी – निरोगी जीवन” या ध्येयाने प्रेरित हा उपक्रम प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प! 💪
चला, आपण सर्वजण मिळून या उपक्रमाला सहकार्य करूया आणि शुद्ध पाण्याचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवूया! 🙌
यावेळी नगराध्यक्ष सौ सुनंदा कापसे, उपनगराध्यक्ष लखन गायकवाड, पाणीपुरवठा सभापती भुषण करंजकर, गटनेते हर्षदा अंबुरे, नगरसेवक शितल चोंदे, प्रशांत लोमटे, नगरसेविका पूजा धोकटे, अर्चना मोरे, अच्युत वाघमारे, पिंटू पवार, रोहित धोकटे , संतोष गोरे. उपस्थित होते.



















Total views : 9127