• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 31, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

आ राजू खरे यांनीही विधानसभेत मुरुमाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत प्रशासनाची उडवली झोप..!!

Sayyad Musa by Sayyad Musa
April 14, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
53
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

आ राजू खरे यांनीही विधानसभेत मुरुमाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत प्रशासनाची उडवली झोप..!!

चिंचोली MIDC मध्ये अवैध मुरूम उत्खननाचा प्रकार उघड ; दोषी मंडल अधिकारी व तलाठ्यावर बडतर्फीची टांगती तलवार!

दैनिक त्रिशक्ती / राजेश शिंदे

मोहोळ : चिंचोली एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खनन प्रकरणाने अखेर राज्य पातळीवर खळबळ उडवली आहे. महसूल यंत्रणेच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या या बेकायदेशीर प्रकारावर आता कठोर कारवाईचे संकेत मिळाले असून, संबंधित दोषी मंडल अधिकारी व तलाठ्यावर थेट बडतर्फीची कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाला कडक आदेश दिले आहेत. या अवैध उत्खननातून शासनाच्या महसुलाला कोट्यवधींचा फटका बसल्याचे स्पष्ट होत असून, संबंधित अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून डोळेझाक केल्याचा ठपका ठेवला जात असताना या अधिकाऱ्यांना नेमके पाठीशी घालतयं तरी कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .
दरम्यान, आमदार राजू खरे यांनीही विधानसभेत हा मुद्दा आक्रमकपणे मांडत प्रशासनाची झोप उडवली. त्यांच्या मते, चिंचोली एमआयडीसी परिसरात तब्बल २० लाख ब्रास मुरूमाचा अवैध उपसा करण्यात मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्या संगमताने करण्यात आला असून, यामुळे शासनाचे सुमारे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर चाललेल्या उत्खननाकडे दुर्लक्ष होणे म्हणजे प्रशासनातील संगनमताचा स्पष्ट पुरावा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या प्रकरणात केवळ महसूल विभागाचे मोहोळचे तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्या कामागेरीवर नेहमीच संशय व्यक्त केला जात असून त्यामुळे तर संबंधित यंत्रणांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अवैध उत्खननामुळे नियोजित औद्योगिक विकासालाही मोठा फटका बसला असून, नवीन उद्योग प्रकल्पांना जागा उपलब्ध होण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे की, या भागातील जमिनीचे ड्रोनच्या सह्याने आणि ईडीएस च्या प्रणालीने केलेल्या उत्खननाचे मोजमाप करून तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्या वेतनातून बुडालेला शासनाचा महसूल वसूल करावा अशी मागणी होत आहे .

महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याऐवजी आर्थिक तडजोडी करून प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. त्यामुळे आता केवळ चौकशी न करता थेट कठोर दंडात्मक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
एकूणच, चिंचोली एमआयडीसीतील हा अवैध मुरूम घोटाळा आता केवळ स्थानिक न राहता राज्य पातळीवरील मोठा घोटाळा ठरत असून, पुढील काही दिवसांत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रशासन खरोखरच कारवाई करते की पुन्हा एकदा प्रकरण दडपले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोट : – शासनाचे स्पष्ट संकेत

दोषी अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करणार .
संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणार .
कोट्यवधींचा महसूल वसूल करण्यासाठी कठोर पावले उचलणार .

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दारू दुकाने बंद ठेवण्याची भीम आर्मी चीं मागणी

Next Post

भिम टायगर सेनेच्या वतीने निळ्या फेट्यांचा सन्मान सत्कार!

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

भिम टायगर सेनेच्या वतीने निळ्या फेट्यांचा सन्मान सत्कार!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विद्यार्थ्यांना सुमारे 5 डझन वह्या व 50 पेन वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार व संघटन बांधणीवर सकारात्मक चर्चा

May 30, 2026

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

May 29, 2026

युवाशक्तीचा आवाज ठरणार जनतेचा नवा विश्वास

May 29, 2026

पार्डी-भिगवण चार लेन महामार्गाला तातडीने मंजुरी द्यावी

May 28, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008006
Total views : 12826

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In