जि. प. प्रा. शाळा सिंदगाव शाळेतील 8 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप.
दैनिक त्रिशक्ती
सिंदगाव राजेंद्र बणजगोळे
आज दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याला निरोप देण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख तथा मुख्याध्यापक करदुरे सर प्रमुख पाहुणे म्हणून कुडकले सर व पाचंगे सर व ललिता पाटील अंगणवाडी ताई उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि सरस्वती पूजनाने झाली. यावेळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आठवीच्या आपल्या ज्येष्ठ बांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळा आणि शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली, ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले. विद्यार्थ्यांनी बाल जीवनातील आठवणींना उजाळा देत छोटे-मोठे किस्से सांगितले व पुढील आयुष्यात यशस्वी होण्याची हमी दिले शिक्षकांनीही त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर शालेय पोषण आहार प्रमुख बसवराज सुतार यांनी सर्व विद्यार्थ्यांना जेवणाची उत्कृष्ट अशी व्यवस्था केली होती. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील जेष्ठ शिक्षिका श्रीमती बटगेरी , श्री. कालेखान, श्री ख्याले श्री भंडारवाड श्री गटलेवार, श्रीमती मोरे मॅडम श्रीमती नळगिरी मॅडम सागर पाटील चंद्रकांत शिंदे, अजय शिंदे, बसवराज सुतार. आदींनी परिश्रम घेतले.



















Total views : 9127