कुंडलवाडी शहरात भाजप दिन उत्साहात साजरा
कुंडलवाडी (उमाकांत गुंडाळे):- कुंडलवाडी शहरात भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाने शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.
या सोहळ्याचे नेतृत्व कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ. प्रेरणाताई गजानन कोटलावर यांनी प्रभावीपणे केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्षा सौ. नेहा ताई शैलेश ऱ्याकावार आणि मंडळ अध्यक्ष नरेश (बंटी) ठक्कुरवार यांनीही कार्यक्रमाची सुयोग्य आखणी करत उपस्थितांना प्रेरित केले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकावण्यात आला. विशेष म्हणजे अनेक नागरिकांनी आपल्या घरावर पक्षाचा ध्वज लावून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामुळे शहरभर उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाची खास आकर्षण ठरले ते म्हणजे तब्बल 75 नव्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेत अधिकृतपणे पक्षप्रवेश केला. त्यांनी पक्षाच्या विचारसरणीशी निष्ठा व्यक्त करत “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या घोषवाक्याला बळ दिले.
प्रमुख वक्ते म्हणून अरविंद ठक्कुरवाड, आबाराव संगनोड, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप रामपुरे, चंद्रशेखर सावळीकर आणि महिला शहर अध्यक्षा अंजूताई दाचावार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धती, विकासाच्या संकल्पना आणि जनतेशी असलेले नाते यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला कुंडलवाडीतील सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन नगरसेविका प्रतिनिधी व पत्रकार अमरनाथ कांबळे यांनी केले .
नगराध्यक्षा सौ. प्रेरणाताई कोटलावर यांच्या नेतृत्वाखाली कुंडलवाडी शहरात विकासाची गती वाढत असल्याचे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्यक्षम, दूरदृष्टीपूर्ण आणि जनहितकारी कामामुळे त्या आज सर्वसामान्यांच्या विश्वासार्ह नेतृत्वाच्या रूपात उदयास आल्या आहेत.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |



















Total views : 9127