लातूर भाजपच्या राजकीय घडामोडींना वेग; माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांची अजित कव्हेकर पाटील यांना सदिच्छा भेट
संघटनात्मक बांधणीसह विशेष संक्षिप्त पुनरीक्षणावर सखोल चर्चा
लातूर : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने धाराशिव भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी लातूर भाजप जिल्हाध्यक्ष अजित कव्हेकर पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR), संघटन विस्तार, बूथ सक्षमीकरण, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची रणनीती तसेच कार्यकर्त्यांच्या भूमिका यावर सकारात्मक विचारविनिमय झाला. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
संघटन हीच पक्षाची खरी ताकद असून तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधणे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पक्षाच्या योजना पोहोचविणे हे प्राधान्य असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. जिल्हा व तालुका स्तरावरील पक्ष संघटना अधिक गतिमान करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.
यावेळी मंडळ अध्यक्ष रोहित पाटील, सरचिटणीस संजय गिर, प्रमोद गुडे, आशिष बोडके व दर्शन कठूर यांची उपस्थिती होती. सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटन विस्तारासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
राजकीय आणि संघटनात्मक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात भाजपच्या संघटनात्मक उपक्रमांना अधिक गती मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |



















Total views : 15039